नवी दिल्ली । नगर सह्याद्री - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासोबतच छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी कोल्हापुरातील शाहू समाध...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासोबतच छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलनाची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कोल्हापुरात बेळगावला जाणारी वाहने रोखण्यात येत आहे. तसेच कोल्हापुरात ग्रामपंचायती निवडणुकाही होत आहे. त्यामुळे वातावरण आणखी चिघळू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहे.
COMMENTS