विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरण पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे, जवळे पुनर्वसन, ...
विश्वनाथ कोरडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरण
पारनेर तालुयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे, जवळे पुनर्वसन, जवळे माळवाडी, सांगवी सूर्या, पिंप्री जलसेन आदी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ईकपयांच्या वतीने टिफीन बॉस चे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वनाथ दादा कोरडे (सदस्य प्रदेश कार्यकारीणी भाजपा महाराष्ट्र राज्य), दिनेश दादा बाबर, गोरक्ष पठारे, संदीप पाटील सालके, नवनाथ सालके, संपत सालके पाटील,अमोल सालके, ज्ञानदेव पठारे, जयसिंग सालके पाटील, विशाल पठारे, वाल्मीक पठारे, शेखर सोमवंशी, बेलोटे सर, विशाल बरशिले,निलेश बरशिले, डॉ.सुरेश पठारे, शांताराम बरशिले तानाजी शेळके, अण्णा सालके, पांडुरंग बरशिले, बाबाजी लोखंडे, शरद कोठावळे, अरुण गायकवाड, सुरेश काळे, भाऊसाहेब पानमंद, भानुदास साळवे यांसह सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले की खासदार डॉ सुजय विखे नेहमी तालुयात विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वसामान्य लोकांना सेवा देत आहेत. लोकसेवा हेच व्रत खर्या अर्थाने सुजय विखे यांनी हाती घेतले आहे. तालुयातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटप करण्यात येत आहे.
COMMENTS