खडकवाडीत आदर्श क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पारनेर | नगर सह्याद्री खडकवाडी सारख्या माळरानावर आदर्श शैक्षणिक संस्थेने नंदनवन फुलवले असून या संस्...
खडकवाडीत आदर्श क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
पारनेर | नगर सह्याद्री
खडकवाडी सारख्या माळरानावर आदर्श शैक्षणिक संस्थेने नंदनवन फुलवले असून या संस्थेला उज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार तालीम संघाचे अध्यक्ष नगरसेवक पैलवान युवराज पठारे यांनी व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असून त्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपली छाप पाडत असतात. शिक्षण क्षेत्रातील बदल स्विकारत खडकवाडीचा शैक्षणिक दर्जा आदर्श शैक्षणिक संकुला मुळे पुढे जात असल्याचे मत नगरसेवक युवराज पठारे यांनी व्यक्त केले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अनेक खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
खडकवाडी(ता.पारनेर) येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पठारे हे बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. त्यांना हवे ते सहकार्य करू. खेळाडूंनी आपले कसब पणाला लाऊन आपल्या आपल्या क्षेत्रात आपले कर्तुत्व सिध्द करण्याचे आवाहन पठारे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष देवराम बबन ढोकळे, लहानू बबन ढोकळे, डॉ. बाबासाहेब ढोकळे यांचे त्यांनी कौतुक केले.
आदर्श क्रीडा महोत्सवात रनिंग, कबडडी, खो-खो, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी तसेच कॅरम आदी इन डोअर गेमचेही आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे बाबासाहेब ढोकळे यांनी सांगितले. राष्ट्रीय कबड्डी खेळाडु समीर ढोकळे, प्रफुल्ल झावरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल रोकडे, कारभारी आहेर, अक्षय ढोकळे, संजय शिंगोटे, प्रकाश शेवंते, विकास रोकडे, ॠषीकेश गंधाडे, अमोल रोकडे, अनिल नांगरे, प्रताप रोकडे, अरूण गागरे, सुदाम आहेर, देवीदास साळुंखे, बी. डी.ढोकळे, प्रसाद कर्नावट उपस्थित होते.
COMMENTS