शानदार सोहळ्यात नागेबाबा मल्टीस्तेटला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान अहमदनगर | नगर सह्याद्री हेतू चांगला ठेवून केलेले कोणतेही काम चांगले...
शानदार सोहळ्यात नागेबाबा मल्टीस्तेटला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान
अहमदनगर | नगर सह्याद्रीहेतू चांगला ठेवून केलेले कोणतेही काम चांगलेच असते. नागेबाबा संस्थेने सुरवाती पासूनच चांगल्या हेतूने चांगले काम केले आहे. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर विराजमान आहेत. नागेश्वर बाबांवर भगवंताचे अधिष्ठान आहे. हजारो बँका पतसंस्था आहेत पण नागेबाबांचे अधिष्ठान असलेली ही संस्था चंद्र सूर्य असेपर्यंत असणार आहे. कडूभाऊ काळेंचे काम इदम् न मम् असेच असल्याने यश त्यांच्यामागे चालून येते. त्यामुळे नागेबाबा संस्थेच्या शाखा भारतासह परदेशातही निघतील व तेथील लोकही संस्थेचे कौतुकच करतील. जे नागेबाबा परिवाराशी जोडले गेले आहेत त्यांना कधीच काहीच कमी पडणार नाही, असे प्रतिपादन हभप केशव उखळीकर महाराज यांनी केले.
नगरच्या नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने देशातील राज्यातील ५७ शाखांच्या माध्यमातून एकही दिवस सुट्टी न घेता वर्षाचे ३६५ दिवस रोज १२ तास आर्थसेवा देत ६ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना तब्बल ४३८० तास ग्राहक सेवा दिली आहे. या अविरत कामकाजाची दखल वर्ल्ड रेकाँर्डस् इंडीया’ या ऑर्गनायझेशनने घेवून नागेबाबा संस्थेस सर्वात जास्त वेळ ग्राहक सेवेच्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले आहे. सावेडी येथील माउली सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात युवा हृदयसम्राट हभप समाधान शर्मा महाराज व वर्ल्ड रेकाँर्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष पवनकुमार सोलंकी यांच्या हस्ते नागेबाबा संस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे यांनी हे विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी अध्यक्ष स्थानाहून हभप केशव उखळीकर महाराज बोलत होते. यावेळी महानुभाव पंथी परांडेकर बाबा व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप समाधान शर्मा महाराज म्हणाले, नागेबाबा परिवाराला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित केलेल्या सोहळ्यास मिळालेली उपस्थिती भाग्याची आहे. कडूभाऊ काळे यांनी कधीही कोणाचाच तिरस्कार केला नाही, कोणावर भारही दिला नाही, उलट सर्वसामान्यांना आधारच दिला आहे. एकट्या माणसाने सुरु केलेली ही संस्था आज मोठ्या परिवारात रुपांतरीत झाली आहे. मात्र थोडाही अहंकार कडूभाऊंना नाहीये यातच त्यांचा मोठेपणा दिसतो. म्हणूनच सबसे आगे रहेंगे नागेबाबा...’ असे म्हणावेसे वाटते. कडूभाऊ काळे म्हणले, नागेबाबा परिवारातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक, मानसिक, वैचारिक सामाजिक, शारीरीक व आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. नुसतीच अर्थ सेवा न देता अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये नागेबाबा पुढे आहे. ३६५ दिवस एकही दिवस सुट्टी न घेता रोज १२ तास सेवा देणार्या या संस्थेने बँकांपेक्षा अधिक पटीने काम केले आहे. सध्याच्या काळात नगरीकांना चांगल्या सेवेची खूप गरज आहे. करोना संकट काळातही हॉस्पिटल मध्ये जाऊन नागरिकांच्या आर्थिक आम्ही गरजा पूर्ण केल्या. यासर्व कामाचे वर्ल्ड रेकाँर्डस् इंडीया’ या ऑर्गनायझेशनने दोन महिनने सर्वेक्षण करून विश्वविक्रमाचा पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी संस्थेच्या सर्व शाखांमधील सर्व कर्मचारीच आहेत. कार्याक्रमचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, संजय मनवेलीकर यांनी आभार मानले. यावेळी कडूभाऊ काळे यांनी ५७ शाखांमधील सर्व कर्मचार्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला. वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराचे मुख्य प्रमाणपत्र प्रदान करतानाही स्वतः मागे रहात कर्मचार्यांनाच पुढे केले. मात्र नागरिकांनी विनंती केल्यावर पुढे जात कडूभाऊ यांनी वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराचे प्रमाणपत्र स्विकारले.
COMMENTS