मुंबईृ : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्यानं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. काही चित्रपटांना ऐश्वर्यानं नकार दिला होता. त्यापैकी एक म्हणजे १९९८ स...
मुंबईृ : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्यानं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. काही चित्रपटांना ऐश्वर्यानं नकार दिला होता. त्यापैकी एक म्हणजे १९९८ साली प्रदर्शित झालेला ’कुछ कुछ होता है’. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. राणी मुखर्जी आधी टीनाची भूमिका ऐश्वर्या रायला ऑफर केली होती. पण तिनं या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्याचा खुलासा ऐश्वर्यानं एका मुलाखतीत केला होता. राणीनं ’कुछ कुछ होता है’मध्ये टीनाची भूमिका साकारली होती, मात्र त्यापूर्वी या भूमिकेसाठी तिनं भूमिका नाकारली. १९९९ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने करण जोहरचा चित्रपट का नाकारला याचा खुलासा केला. ती म्हणाली, ’कुछ कुछ होता है’साठी करण जोहरनं माझ्याशी संपर्क साधला होता, पण तो जी तारिख मागत होता ती तारिख मी आधीच आरके फिल्मसला दिल्या होत्या. ऐश्वर्याने पुढे सांगितले की, तिला ’कुछ कुछ होता है’ या चित्रपटात अशा भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, जी ती तिच्या मॉडेलिंगच्या काळात करत होती.
COMMENTS