मुबंई / नगर सहयाद्री आंबिवली स्थानकात धक्कादायक घटना घडली.या घटनेनं खळबळ पसरली आहे.सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर द...
आंबिवली स्थानकात धक्कादायक घटना घडली.या घटनेनं खळबळ पसरली आहे.सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर तर तिकीट तपासात होते.यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितलं तेव्हा त्या प्रवाशानं ब्लेडनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.सुनील गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचं नाव आहे या हल्ल्यात टीसी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कल्याणजवळ असलेल्या आंबिवली स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशानं ब्लेडनं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सुनील कुमार गुप्ता असं जखमी झालेल्या टीसीचं नाव आहे. सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर ते तिकीट तपासत होते.यावेळी एका प्रवाशाला त्यांनी तिकीट दाखवायला सांगितलं.या प्रवाशानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला,याच दरम्यान टीसीनं या प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला.याचवेळी प्रवाशाने खिशातले ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करीत प्राण घातक हल्ला केला.
पण अनेकदा काही लोक विनातिकीट प्रवास करत असल्याचं आढळून येतं. याच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी टीसी तिकीट तपासतात. तसेच, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंड आकारतात.या हल्ल्यात जखमी झालेल्या गुप्ता यांना तात्काळ रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवानं या हल्ल्यात सुनील गुप्ता यांचा जीव बचावला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
COMMENTS