सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावातील मागील चार वर्षापासून प्रलंबित कचरा जागेसाठी मागणी सागर मैड यांच्या माध्यमातून खासदार ...
पारनेर तालुक्यातील सुपा गावातील मागील चार वर्षापासून प्रलंबित कचरा जागेसाठी मागणी सागर मैड यांच्या माध्यमातून खासदार सुजय दादा विखे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
सुपा हे पारनेर तालुक्यातील सर्वात जलद गतीने वाढणारे गाव म्हणून नावारूपाला येत आहे. सुपा गावा लगन मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत वाढत आहे. त्या ठिकाणी कामाला असणारे अधिकारी, कामगार वर्ग हा सुपा गावात रहिवासी आहे. त्याचबरोबर सोयीचे गाव म्हणून आसपासच्या गावातील अनेकांची पसंती सुपा गावास आहे. हा वाढणारा रहिवास पाहता यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होत आहे. त्यात अनेक प्रश्न नव्याने निर्माण होतात. त्यातलाच सुपा गावाचा कचरा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा असूनही या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नव्हती. त्याकरिता मागील चार वर्षापासून विविध स्तरावर मागणी केली गेली होती.अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून हा प्रस्ताव २०२० मध्ये स्वीकारून त्यासाठी लागणार्या ना हरकत प्रमाणपत्र, विविध कागदपत्रांचा पाठपुरावा इत्यादी गोष्टींची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, विविध पत्र व्यवहार हा वेळोवेळी पूर्ण करून आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून सदर जागेचा प्रस्ताव आपल्या स्तरावर मंजूर करून पुढील कारवाईसाठी नाशिकला पाठवण्यात आलेला आहे. हा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाल्याचे सागर मैड यांनी सांगितले.सदर प्रस्ताव मंजूर होताच सर्व कागदपत्रांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांना जागा कचरा विलगीकरण कक्षासाठी मिळणे बाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताच खासदार सुजय विखे पाटील यांनी ही जागा तातडीने मिळवून देण्याचे सांगितले आहे. हा सुपा गावाच्या विकासा साठी खूप महत्त्वपूर्ण विषय आहे, आणि तो मी स्वतः हाताळून तातडीने मार्गी लावेल अशी ग्वाही खासदार विखे यांनी यावेळी दिली. मागील काही दिवसात सुपा गावा सह पारनेर तालुयातील अनेक विषय विखे पाटील यांनी अतिशय जलद गतीने मार्गी लावले आहेत. आणि भविष्यातही त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणावर या परिसरासाठी असणार आहे.या जागा मागणी प्रस्तावासाठी मागील चार वर्षापासून आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, महसूल शी निगडित अधिकारी, त्यासाठी लागणार्या सर्व विभागातील ना हरकती साठी त्या त्या अधिकार्यांच्या सह, सुपा गाव, व परिसरातील मार्गदर्शक, व अनेकांचे मोठे सहकार्य लाभले आहे आणि त्याची प्रचिती हा विषय मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. लवकरच सुपा कचरा विलेगिकरण कक्षासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल अशी आशा भाजयुमो पारनेर तालुका सरचिटणीस तथा माजी उपसरपंच सागर भास्करराव मैड यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS