संगमनेर | नगर सह्याद्री अहमदनगर येथील वाडिया पार्क जलतरण तलावात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा...
अहमदनगर येथील वाडिया पार्क जलतरण तलावात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा जलवा बघायला मिळाला. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन गटात ध्रुवच्या स्पर्धकांनी नेत्रदीपक प्रदर्शन करतांना तब्बल २३ सुवर्ण पदकांसह ५३ पदकांची कमाई केली. १४ ते १९ वयोगटातील शालेय स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकामागून एक पदके पटकावतांना ध्रुव ग्लोबलने संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व राखले.
मुलींच्या १४ वर्षांखालील गटात गार्गी विखेने दोनशे मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळविले. याच वयोगटातील तनुजा पागडे हिने शंभर मीटर बॅकस्ट्रोक व फ्रीस्टाईल रिले या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदकांसह ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर मुलांच्या गटातील स्वयंम शिंदेने ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि फोर बाय शंभर मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये कांस्य पदक मिळवले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी पाडेकर या ध्रुवच्या जलतरणपटूने ५० अणि शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दोन सुवर्ण पदके पटकाविली.
जान्हवी मेमाणेने ५० मीटर बटरफ्लाय व शंभर मीटर फ्रीस्टाईल प्रकारात अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकं मिळवले. तर याच वयोगटातील यज्ञा भावसारने दोनशे मीटर फ्री स्टाईल, फोर बाय शंभर मीटर फ्री स्टाईल व फोर बाय शंभर मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्ण पदके मिळवतांना ध्रुव ग्लोबलची पदक तालिका उंचावर नेली. मुलांच्या गटातही दीप पडताणी याने ५० आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण व रौप्य, तर आदित्य राजुस्करने याच अंतराच्या बटरफ्लाय प्रकारात अनुक्रमे रौप्य व सुवर्ण पदकं मिळवले. शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण आणि शंभर व दोनशे मीटर फ्री स्टाईल प्रकारात रौप्य पदके मिळवतांना ध्रुव पलोडने आपल्या संघाच्या यशाची पताका फडकती ठेवली.१९ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रवण मुंदडा याने ५० व २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण, चारशे मीटर व फोर बाय शंभर फ्री स्टाईल रिले प्रकारात कांस्य आणि वॉटरपोलो प्रकारात रौप्य पदक मिळवले. याच वयोगटातील मुलींच्या शंभर मीटर फ्री स्टाईल प्रकारात मधुरा कोळपकरने कांस्य पदक मिळवतांना आपल्या संघाच्या यशाला झळाळी मिळवून दिली. या स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने २३ सुवर्ण, १९ रौप्य व ११ कांस्य पदकं पटकावली. नीलेश पाटील व सविता देशमुख यांनी ध्रुवच्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS