अभिनेत्रीला एकटी पाहून लुटण्यात आले. त्यात अपयश आल्याने चोरट्यांनी अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या केली.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
झारखंडमधील अभिनेत्री ईशा आल्याची बुधवारी (२८ डिसेंबर) पश्चिम बंगालमधील हावडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अभिनेत्रीला एकटी पाहून लुटण्यात आले. त्यात अपयश आल्याने चोरट्यांनी अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
अभिनेत्री ईशा आल्या तिचा पती चित्रपट निर्माते प्रकाश कुमार आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत राष्ट्रीय महामार्ग १६ वरून कोलकाताकडे जात होती. त्याचवेळी ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, सकाळी सहाच्या सुमारास ईशा आल्या आपल्या कुटुंबासोबत बागनान पोलीस स्टेशन हद्दीतील महिश रेखाजवळ थांबली होती. त्याचवेळी तीन जणांनी तिच्यावर हल्ला करून सामान लुटण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी ईशा आल्यावर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, पती प्रकाश कुमार याने अभिनेत्रीला कारमध्ये नेले आणि मदतीच्या शोधात सुमारे तीन किलोमीटर भटकले. कुलगचिया पिरताळा येथे महामार्गाच्या कडेला काही लोकांना दिसले व त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. स्थानिकांनी तिला मदत केली आणि अभिनेत्रीला उलुबेरियाच्या एससीसी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी ईशा आल्याला मृत घोषित केले.
COMMENTS