पुणे / नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या...
पुणे / नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे. जयकुमार गोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
२४ डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळून जयकुमार गोरे यांचा अपघात झाला.त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं.याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाऊन शरद पवारांनी गोरेंची चौकशी केली आहे.
पक्ष वेगळे असले आणि विरोधक असले तरी देखील प्रकृतीची विचारपूस करणं आणि संकटात एकमेकांची साथ देणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे. देशात अनेकदा महाराष्ट्राच्या याच हटके राजकारणाची चर्चा होते. शरद पवारांनी गोरेंची घेतलेली भेट राज्यातील राजकारणाचं वेगळेपण जपते.
COMMENTS