अहमदनगर । नगर सह्याद्री नव्या वर्षाची चाहूल लागताच सर्वांना दिनदर्शिकेचे वेध लागतात. जय आनंद महावीर युवक मंडळ प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल अ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नव्या वर्षाची चाहूल लागताच सर्वांना दिनदर्शिकेचे वेध लागतात. जय आनंद महावीर युवक मंडळ प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल अशी दिनदर्शिका दरवर्षी प्रकाशित करीत असते. यात फक्त तारखाच नाहीत तर सर्व सणवार, महत्त्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची समग्र माहिती आहे. दिनदर्शिका छापूनच न थांबता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही मंडळ सातत्याने करते. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात असावे अशी सुंदर दिनदर्शिका मंडळाने केली आहे, असे प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सन 2023 या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नरेंद्र फिरोदिया, मर्चंटस बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, संचालक अनिल पोखरणा यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सिध्देश मोटर्सचे संचालक सचिन मुनोत, रमणलाल भंडारी, आंतरराष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू दिशान गांधी, सी.ए.ऋषभ गांधी, देवेंद्र गांधी, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, हेमंत मुथा, अमित गांधी आदींसह मंडळाचे सभासद उपस्थित होते.
अनिल पोखरणा म्हणाले की, सातत्यशील व समाजपयोगी उपक्रम जय आनंद मंडळाचे वैशिष्ट्य आहे. दिनदर्शिकतेची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे. यात लोकांना खुप उपयुक्त ठरणारी माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. दिनदर्शिका अनेक अर्थांनी सर्वासाठी मार्गदर्शिका आहे.
मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. यंदाही या दिनदर्शिकेत दिन विशेष देण्याबरोबरच महत्वाचे फोन नंबरही देण्यात आलेत. यात पोलिस स्टेशन, साप पकडणारे सर्पमित्र, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गॅस सेवा, पावर हाऊस, सामाजिक संस्था, बँका, पतसंस्था, ट्रॅव्हल्स, हुरडा पार्टी, ड्रायव्हिंग स्कूल, सुतार, प्लंबिंग, मंगल कार्यालये, केटरर्स, मंडप डेकोरेटर, इव्हेंटस, बँड बाजा, घोडी, स्नॅक्स, सिनेमागृह, विमान तिकिट, पासपोर्ट कार्यालय, सिटी सर्व्हे व म्युनसिपल टॅक्सेस भरणा, कुरियर सर्व्हिस, एस.एम.एस.सर्व्हिस, कॅण्डल, ब्लड बँक, नगर व पुण्यातील हॉस्पिटल्स, नेत्रदान संस्था, रूग्ण साहित्य भांडार, रूग्णवाहिका, संथारा डोली साहित्य, वृत्तपत्रे कार्यालय, शुध्द शाकाहारी हॉटेल्स, हुरडा पार्टीची ठिकाणे, कॉम्प्युटर, मोबाईल विक्री व दुरूस्ती सेवा दालने यांचे दूरध्वनी क्रमांक दिनदर्शिकेत आहेत.
मंडळाचे सदस्य ही दिनदर्शिका घरी, कार्यालये, दुकानांत पोहोच करीत आहेत. दिनदर्शिकेसाठी हेमंत मुथा, अमित गांधी, प्रकाश गांधी,मंगल प्रिंटर्सचे कमलेश शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सेक्रेटरी आनंद मुथा यांनी आभार मानले
COMMENTS