मुंबई : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्...
मुंबई : तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले आहे. त्यांना पुढील सुनावणीला कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान तालिबान आणि संघाची कथित तुलना केली होती. यावर संघ समर्थक असल्याचा दावा करणारे वकील संतोष दुबे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर अख्तर यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यक वापर केल्याचे दुबे यांनी म्हटले आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने अख्तर यांना ६ जानेवारीला मुलुंड न्यायालयातसुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS