सर्वपक्षीय शिवप्रेमीची मागणी जामखेड | नगर सह्याद्री शहरातील खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी जामखेड नगरपरिषदेन...
सर्वपक्षीय शिवप्रेमीची मागणी
जामखेड | नगर सह्याद्रीशहरातील खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी जामखेड नगरपरिषदेने प्रारूप विकास योजनांच्या जमिन वापर नकाशात आरक्षण ठेवावे अशी मागणी शहरातील सर्व पक्षिय शिवप्रेमींनी केली आहे. याबाबत तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगरपरिषद विकास योनजेचे काम प्रगतीपथावर असून विद्यमान जमिन वापर नकाशा नगरपरिषद कार्यालयास सुपूर्द (हस्तांतरीत) करण्यात आलेले आहे. दि. २० रोजी पंचायत समितीत नगररचना अधिकारी अहमदनगर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सध्यास्थितीत प्रारुप विकास योजना तयार करतांना शहराच्या दृष्टीने प्रस्तावित जमिन वापर नकाशात आरक्षणे प्रस्तावित करणे आवश्यक असल्याने तसेच प्रारुप विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा यांचा सहभाग मिळावा. खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे ही शिवप्रेमींची मागणी आहे. त्याअनुषंगाने निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडूराजे भोसले, अजयदादा काशीद, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सुनील जगताप, सचिन देशमुख, प्रदीप टाफरे, मंगेश आजबे, जयसिंग उगले, राजु गोरे, नाना खंडागळे, भाऊ पोटफोडे, गणेश जोशी, देवा भादलकर, सचिन शिंदे आदींनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या बरोबर गुरुवारी चर्चा केली व निवेदन दिले. निवेदनाच्या प्रति अहमदनगर नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक, खा. सुजय विखे, आ. रोहित पवार, आ. प्रा. राम शिंदे यांनाही देण्यात आले आहेत.
COMMENTS