मुंबई / नगर सहयाद्री तीन वर्षांत पाच हजार गावांमध्ये योजना राबविण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंडाळण्यात आलेले जलयुक्त श...
तीन वर्षांत पाच हजार गावांमध्ये योजना राबविण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंडाळण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान पुन्हा राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे महत्त्वाकांक्षी अभियान पुढील तीन वर्षांत पाच हजार गावांत राबविण्यात येणार आहे.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ या अभिनव योजनेची सुरुवात केली होती. फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून सन २०१५-२०१९ या कालावधीत ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. ही योजना २२ हजार ५९३ गावांत राबविण्यात आली आणि यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली.
जलयुक्त शिवार अभियानाच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील.या अभियानच्या टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबवला गेला,पण अद्याप पाण्याची गरज आहे तिथे ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहे.या अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील.
या अभियानात मोठय़ा प्रमाणात घोटाळे होत असल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात होऊ लागल्यानंतर सरकारने या अभियानाच्या चौकशीचे आदेश दिले होते.त्यासाठी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभियान काळात झालेल्या कामांची चौकशी करण्यात आली. त्यात काही कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कामे रद्द करण्यात आली. तसेच दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईही सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे हे अभियानही बंद करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.
गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील.महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंडाळण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान पुन्हा राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे महत्त्वाकांक्षी अभियान पुढील तीन वर्षांत पाच हजार गावांत राबविण्यात येणार आहे.
COMMENTS