स्पोर्ट्स । नगर सह्याद्री - टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात घडला आहे. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारा...
स्पोर्ट्स । नगर सह्याद्री -
टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात घडला आहे. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारने तीन-चार उलटून पेट घेतला आहे. या भयंकर घटनेत ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पंतच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
ऋषभ पंत कसा तरी गाडीतून बाहेर पडला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. अपघातानंतर ऋषभच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी बरीच माहिती दिली आहे.
अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्या उजवा पाय फ्रॅक्चर तर पाठीला गंभीर दुखापतही झाली आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यालाही बराच मार लागला आहे. सध्या पंतची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पंतच्या अपघाताची बातमी कळताच, क्रिडाप्रेमींच्या काळाजाचा ठोका चुकला आहे. बांग्लादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत पंतने चांगली कामगिरी केली होती. मात्र, असे असूनही त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात त्याला वगळण्यात आले आहे. ऋषभ पंत एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेचा दोन्हीचा भाग नाही. हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.
COMMENTS