मुंबई । नगर सह्याद्री - कोरोनाची नवीन लाट आल्याची चीनमध्ये चर्चा चीनमध्ये कोरोना निर्बंध हटवल्यानंतर लगेच रुग्णालयांत सर्दी-तापाच्या रुग्णा...
मुंबई । नगर सह्याद्री -
कोरोनाची नवीन लाट आल्याची चीनमध्ये चर्चा चीनमध्ये कोरोना निर्बंध हटवल्यानंतर लगेच रुग्णालयांत सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. चार दिवसांत रुग्णालयात सर्दी-पडसे आणि तापाशी संबंधित रुग्ण जास्त दाखल होत आहे. यामुळे रुग्णालयांत तापाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.चीनच्या आरोग्य विभागाने बुधवारी कोरोना प्रोटोकॉलमध्ये विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या. यानंतर अधिकृतरीत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आली आहे.
मात्र, तापाने फणफणणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बीजिंगच्या रुग्णालयांत तापावर उपचार करून घेण्यासाठी लांब रांगा लावल्या आहे. फार्मसीमध्ये अँटिजन टेस्ट किट आणि फेस मास्कही नव्हते. दुसरीकडे, रविवारी कोरोना महामारीमुळे १०,८१५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यात ८,४७७ रुग्णांत लक्षणे नाही. अनेक कठोर निर्बंधाला लोकांनी विरोध केला होता. त्यानंतर चीनने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रवासासाठी चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
COMMENTS