मुंबई । नगर सह्याद्री - हॉलिवूडच्या चाहत्यांसाठी एक दुखांकित बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डीजे स्टीफन बॉस य...
मुंबई । नगर सह्याद्री -
हॉलिवूडच्या चाहत्यांसाठी एक दुखांकित बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डीजे स्टीफन बॉस यांने आत्महत्या केली आहे. मंगळवार 13 डिसेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. बॉसने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह हॉटेलच्या एका खोलीत सापडला आहे.
टीएमएच्या अहवालानुसार, पोलिसांना लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत बॉसचा मृतदेह सापडला आहे. स्टीफन बॉसची पत्नी अॅलिसन हॉकरने सांगितले की, स्टीफन त्याच्या कारशिवाय घराबाहेर गेला होते.
स्टीफन बॉसच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबासाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
स्टीफन बॉसच्या मृत्यूनंतर, त्यांची पत्नी अॅलिसन हॉकर यांनी एका निवेदनात सांगितले की, मला जड अंतःकरणाने सांगायचे आहे की माझे पती स्टीफन यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. तो आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व द्यायचा, प्रेम हेच त्याच्यासाठी सर्वस्व होते. तो आमच्या कुटुंबाचा कणा होता. तो एक चांगला पती आणि वडील होता,. त्याच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणा होता. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच जाणवत राहील आहे.
स्टीफनविषयी बोलताना अॅलिसन म्हणाली, "स्टीफन, आमचे तुझ्यावर प्रेम आहे, आम्हाला तुझी आठवण येईल आणि माझा शेवटचा डान्स नेहमीच तुझ्यासाठी असेल". स्टीफनप्रमाणेच त्याची पत्नी देखील डान्सर आहे. दोघांनी 2013 मध्ये लग्न केले होते.
COMMENTS