गुजरात वृत्तसंस्था गुजरातच्या नवसारीमध्ये कार आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराच...
गुजरात वृत्तसंस्था
गुजरातच्या नवसारीमध्ये कार आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या कारला धडकली. या घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातग्रस्त बस ही सूरतहून वलसाडच्या दिशेने जात होती.त्याचवेळी समोरून येणाऱ्या फॉर्च्यूनर कारमधून ९ जण प्रवास करीत होते. बसचालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बसने थेट फॉर्च्युनर कार ला धडक दिली.धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.तर बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर रोडवर वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या.एक क्रेनच्या साहाय्याने बसला बाजूला घेण्यात आले.अपघातात जखमी झालेल्या ११ जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर इतर १७ जणांनर वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जे प्रवासी किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.
COMMENTS