उस्मानाबाद / नगर सहयाद्री राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरू झाली असून ...
राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरू झाली असून आतापर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. एकीकडे विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे.उस्मानाबादेत मतमोजणीपूर्वीच महिला उमेदवाराच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
मृत रामहरी गोरे यांच्या पत्नी सुनीता गोरे या देखील निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या.यावेळी गोरे यांनी आपल्या पत्नीचा जोरदार प्रचार केला.मात्र, निवडणुकीचा निकाल येण्याआधीच आज सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वाटेतच गोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.भाजप आमदार राणा पाटील यांचं हे मूळ गाव आहे.भाजप, महाविकास आघाडी आणि आम आदमी पार्टी अशी तिहेरी लढत होत आहेत.तिनही पॅनलकडून निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला असून वेगवेगळी रणनिती देखील आखण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. येथील प्रभाग १ मधून लढत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता गोरे यांचे पती रामहरी गोरे यांचा आज सकाळीच हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS