बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांचे आज २९ डिसेंबर रोजी निधन झाले.
मुंबई / नगर सह्याद्री -
सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांचे आज २९ डिसेंबर रोजी निधन झाले. नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तात्काळ कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नितीन मनमोहन त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
नितीन मनमोहन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली. 'बोल राधा बोल', 'लाडला', 'दस' 'रेडी' सारखे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्माती नितीन मनमोहन यांनी केली होती.
COMMENTS