मुंबई / वृत्तसंस्था महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये व सक्तीची वीज वसुली थांबवावी याबाबत ...
मुंबई / वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये व सक्तीची वीज वसुली थांबवावी याबाबत नुकतीच घोषणा केली होती. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अजूनही सक्तीची वीज वसुली सुरूच आहे.तसेच विजेच देयक न भरलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय दरम्यान सरकारचे आदेश असताना देखील अधिकाऱ्यांनी विज कनेक्शन तोडल्याने एका शेतकऱ्याने उपमुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीची वीज वसुली थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आपण शेतात लागवड करण्यासाठी रोपांची खरेदी केली.मात्र रोपांची वाढ होत असताना अचानक शेतातील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने सगळी रोपे सुकली आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाल आहे, असा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.शेतकऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले आहेत आणि सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी खोटं बोलणं हे चुकीचं असल्याने आपण तक्रार दाखल केल्याचं या शेतकऱ्यांन सांगितलं आहे. सध्या शेतकऱ्याची तक्रार नोंद केली आहे. तसेच शेतकरी आता पुढे कोणते पाऊल उचलनार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS