अहमदनगर । नगर सह्याद्री प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना कळतनकळत ताणतणाव येतो. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे व शरीराकडे द...
अहमदनगर । नगर सह्याद्री
प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना कळतनकळत ताणतणाव येतो. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे व शरीराकडे दुर्लक्ष करतो. व्यायाम नसल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचा कामावर परिणाम होतो. वर्षातून किमान एकदा क्रीडा स्पर्धांचे आयोजन गरजेचे आहे. ताणतणावापासून मुक्तीण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. स्पर्धांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने जल्लोष 2022 अंतर्गत दोन दिवशीय जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
रफिक नाईकवाडे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षे स्पर्धा झाल्या नाहीत. कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांत कृषी जल्लोषअंतर्गत कला व क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. जिल्ह्यांतर्गत विजयी संघास व खेळाडूंना विभागीय स्तरावर संधी मिळते. स्पर्धेमुळे ताणतणाव दूर होऊन कामाला प्रोत्साहन मिळते, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात कृषी उपसंचालक रवींद्र माने म्हणाले की, कृषी जल्लोष 2022 अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय दोन दिवशीय कला व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते झाले. कृषी कर्मचार्यांतील कलागुणांना वाव मिळून तणावमुक्तीसाठी या स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले. सोमनाथ बाचकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय म्हेत्रे यांनी केले.
याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे (पुणे), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद लहाळे, डॉ. महावीरसिंग चौहान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, प्रशासनाधिकारी अशोक गिरवले (पुणे), क्रीडाधिकारी गायकवाड, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, गहिनीनाथ कापसे, आत्माचे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, अनिल गवळी, जि. प. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश बिबवे, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, राजेंद्र सुपेकर, राजकुमार वाणी, शंकर खाडे, दत्तात्रेय रोखले, अशोक बोरा, सुशीलकुमार पैठणकर यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS