मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणार्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले. कट्टर शिवसैनिक ...
मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणार्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले. कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. ठाणेकरांसाठी जीव ओतणारा नेता म्हणून दिघे यांच्याकडे पाहिलं गेलं. १३ मे रोजी दिघे यांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. बॉस ऑफिसवरही तुफान मजल मारली. धर्मवीर सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. प्रवीण तरडे दिग्दर्शित ’धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविला होता. चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मंगेश देसाई म्हणाले की, ’धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यात आहेत, जे लोकांपर्यत पोहोचले नाहीत. दुसर्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. धर्मवीरच्या पुढच्या भागात अनेक रहस्य उलगडणार असल्याचं म्हटलं जात आहे. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे. ’धर्मवीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकार व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ’धर्मवीर’च्या पुढील भागाची घोषणा चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी केली. ’धर्मवीर’ सिनेमात आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमया कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे.
COMMENTS