बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा; रक्तदान शिबिराचेही आयोजन अहमदनगर | नगर सह्याद्री महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्य...
बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा; रक्तदान शिबिराचेही आयोजन
अहमदनगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचाराने समाज प्रेरित आहे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमातून संस्कृतीचे जतन होते. आजच्या युवा पिढीला अध्यात्माचे धडे देणे गरजेचे आहे. मनुष्याने विज्ञानात प्रगती केली असली तरी अध्यात्मिक व धार्मिकतेची शिकवण आवश्यक आहे. असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांनी केले.
बोल्हेगाव येथे श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. सभापती कुमारसिंह वाकळे, बाळासाहेब वाकळे, रमेश वाकळे, अरूण ससे, भाऊसाहेब वाकळे, रावसाहेब वाटमोडे, सनी वाकळे, दशरथ वाकळे, पंकज वाकळे, मारूती वाटमोडे, रावसाहेब वाकळे, दत्तुआप्पा वाकळे, विजय वाकळे, मच्छिंद्र देशमुख, वैभव वाटमोडे, आकाश वायकर, महेश वाकळे, संपत वाकळे, यौगेश भोसले, रोहित वाकळे, मच्छिंद्र वाकळे, सतीष आढाव, सतिष केदारी, गणेश खेतमाळीस, सुभाष बर्डे, सतीश संसारे, दिपक वराट, गौतम कळकुंबे, नवनाथ खराडे, पवन चाफे अर्जुन रोहोकले, सुधाकर ठाणगे, रोहिदास आंबेडकर, रामकिसन बामदळे, गंगाधर कराळे, नाथाभाऊ वाटमोडे, लहानु वाटमोडे, पांड्डरंग भिंगारदिवे, बबन देशमुख, बाळासाहेब देठे, मारूती काटे, किशोर कराळे, शिवाजी कराळे, एकनाथ कराळे, शरद महापुरे, कांतीलाल वाकळे, भिमानाना वाकळे, संजय वाकळे, बबन कराळे, आसाराम कराळे, सुधाकर गव्हाणे, रंगनाथ गवळी, रवि कोलते, सुरज कोलते, राम शिंदे, निजामुद्दीन सय्यद, प्रकाश निमसे, सुनिल देठे, तुषार कोलते, मोहन गाडे आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
श्री दत्त महाराज मूर्ती मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी ठीक ठिकाणी आकर्षक रांगोळी फुलांची सजावट व फटायांची अतिशबाजी करण्यात आली होती ही मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडली.
COMMENTS