मुंबई । नगर सह्याद्री - लालगबाग परळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अविघ्न पार्क येथे टोलेजंग इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची माहित...
मुंबई । नगर सह्याद्री -
लालगबाग परळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अविघ्न पार्क येथे टोलेजंग इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीच्या २२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब रवाना झाले आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली असून आगीचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे.
आगीनंतर इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढले जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. याआधी सुद्धा अविघ्न पार्क इमारतीमध्ये आग लागली होती. १९ व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते.
मुंबईतील लालबाग परिसरात ही एकूण 60 मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहे. त्याशिवाय अनेक बैठी घरे, चाळीही आहे. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. दरम्यान, अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
लालगबागमधील अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.#Mumbai #Lalbaug #BuildingFire #ViralVideo pic.twitter.com/zGZ5SrV0Sc
— Satish Daud (@Satish_Daud) December 15, 2022
COMMENTS