औरंगाबाद / नगर सहयाद्री- औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पत्नी ला तिचा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल...
औरंगाबाद / नगर सहयाद्री-
औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पत्नी ला तिचा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने आपल्या पतीविरोधात केला आहे. या प्रकरणी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे.सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याने पीडित महिला आपल्या माहेरी राहत होती.महिलेने म्हटले आहे की, तिचा विवाह औरंगाबाद येथील बायजीपुरा येथे पार पडला. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.या संदर्भात महिलेन मनमाड येथे फिर्यादही दिली आहे.
दरम्यान शिविगाळ करत व जिवे मारण्याची धमकी देत पतीने इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापीत केल्याची तक्रार महिलेने दिली आहे पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS