औरंगाबाद / नगर सहयाद्री औरंगाबाद जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे.आशा घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.बहिणीला पळवून नेल्याच्या र...
औरंगाबाद / नगर सहयाद्री
औरंगाबाद जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे.आशा घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने पुणे महामार्गावर भरदिवसा एका तरुणांची कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या केली.
भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.मयत ईसमाने ३ वर्षापूर्वी सासरच्या नातलगांचा विरोध झुगारून पळून जाऊन एका तरुणीशी प्रेम विवाह केला होता.तीन वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेल्याच्या राग मनात धरत मयत व्यक्ती औरंगाबाद-पुणे महामार्गावरून दुचाकीने जात असताना त्यांच्या मेव्हण्याने महामार्गावरील दहेगाव बंगला जवळील इसारवाडी फाटा येथे अडविलं कुठलिही विचारपूस न करता धारदार कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला चढविला एका नंतर एक असे सपासप वार करत निर्घृण हत्या केली.
धक्कादायक बाब म्हणजे,मयत रस्त्यावरच कोसळला.मयत रस्त्यावर तडफडत होता.त्याच वेळी मारेकरी हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड खांद्यावर ठेऊन तो प्रसंग पाहत उभा होता.मारेकऱ्यानं अंगावरील शर्ट काढला आणि तो शर्ट हवेत गोल फिरवत जल्लोष केला.तेथे नृत्य केलं आणि दुचाकीवरुन तिथून पसार झाला.हे भयावह दृश्य पाहून महामार्गाने जाणारे येणारे देखील भयभीत झाले होते.
COMMENTS