औरंगाबाद / नगर सहयाद्री- सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुप्तधनासाठी तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.यात तरुण गंभीर जखम...
औरंगाबाद / नगर सहयाद्री-
सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुप्तधनासाठी तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.उपचार सुरु असून, अजूनही तो बेशुद्ध अवस्थेत आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या ग्रामीणच्या वडोदबाजार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भगवान खरात असे जखमी तरुणाचे नाव असून, तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरू गोपाल खरात, विठ्ठल एकनाथ फरकडे, आणि भाऊसाहेब विट्ठल फरकडे असे तिन्ही आरोपींचे नावं आहेत.
नेहमीप्रमाणे हा गावात गेला होता.दरम्यान यावेळी गावातील कचरू गोपाल खरात, विठ्ठल एकनाथ फरकडे, आणि भाऊसाहेब विट्ठल फरकडे यांनी भगवान बोलावून घेतले.जादूटोणा करण्याच्या उद्देशाने सुरवातीला भगवान याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.तसेच गुप्तधन काढण्यासाठी जादूटोणा करण्याच्या उद्देशाने त्याला सुरवातीला दारू पाजली. त्यानंतर त्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. ज्यात भगवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
COMMENTS