स्पोर्ट्स । नगर सह्याद्री - क्रिडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या कारला भीषण अप...
स्पोर्ट्स । नगर सह्याद्री -
क्रिडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातात ऋषभ पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऋषभ पंतची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला रेफर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंत हा दिल्लीहून उत्तराखंड येथील आपल्या घरी जात असताना, रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की, कार तीन ते चार वेळा उलटली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत पंत हा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली.
अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खूप दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यालाही बराच मार लागला आहे. अपघातानंतर पंतला तातडीने दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे पंतवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
COMMENTS