वॉशिंग्टन । वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा एक्सबीबी 15 चा नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आह...
वॉशिंग्टन । वृत्तसंस्था -
कोरोना व्हायरसचा एक्सबीबी 15 चा नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांच्या म्हणण्यानुसार हा व्हेरिएंट पूर्वीच्या प्रकारापेक्षा 120 पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे.
एक्सबीबी 15 हा व्हेरिएंट कोरोनाचा सुपर प्रकार असल्याचे डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग म्हणाले, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग 17 ट्विट करित आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे.
या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळला आहे. डिंग यांच्या दाव्यानुसार सीडीसीने गेल्या दोन आठवड्यात एक्सबीबी 15 प्रकाराचे योग्य आकडे जाहीर केले नाहीत. डिंग यांनी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या काही व्यक्तींचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या मते, कोरोनाची ही आकडेवारी सीडीसीने जाहीर केलेली नाही. नवीन प्रकाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1% वरून 40% पर्यंत उडी दर्शविली आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेत या नवीन कोरोना प्रकाराच्या प्रकरणांमध्ये 40% वाढ झाली आहे.
COMMENTS