नवी दिल्ली । नगर सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटे...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा, असे प्रक्षोभक विधान मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पटेरिया यांनी केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते कार्यकर्त्यांना चिथावणी देत असल्याचे दिसत आहे.
पटेरिया म्हणाले, मोदी निवडणूक पद्धत संपुष्टात आणतील. धर्म, जाती भाषेच्या आधारावर देशात फूट पाडतील. त्यांच्यामुळे दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांचे जीवन संकटात सापडले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदी यांच्या हत्येसाठी तयार रहा. त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ पन्ना जिल्ह्यातील पवईचा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान वादग्रस्त व्हिडिओ उजेडात आल्यानंतर पटेरिया यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे स्पष्ट केले. व्हायरल झालेला व्हिडिओ कार्ड वितरणाच्या काळातील आहे. त्यातील मोदींच्या हत्येसंबंधीच्या विधानाचा विपर्यास आहे. मी गांधींना मानणारा व्यक्ती आहे. मी अशा प्रकारचे विधान करू शकत नाही. हत्येचा अर्थ त्यांचा राजकीय पराभव करणे, असा असल्याचे स्पष्ट केले.
COMMENTS