काँग्रेसचे गांधीधामचे उमेदवार भरतसिंह सोलंकी यांनी मतमोजणी केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. भाजप पुन्हा एकदा विजयाकडे वाटचाल करत आहे. पक्षाने १५० हून अधिक जागांवर आघाडी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे गांधीधामचे उमेदवार भरतसिंह सोलंकी यांनी मतमोजणी केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला. सोलंकी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आणि गळ्यात फास बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला.
भरत सोळंकी यांनी ईव्हीएम नीट सील केले नसल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर काही ईव्हीएमवर स्वाक्षरीही नव्हती. सोलंकी आधी मतमोजणी कक्षात धरणे धरून बसले आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.
COMMENTS