लवकर संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र मिळून संस्थेच्या नगर शहरात दोन शाखा सुरू होणार असल्याचेही औटी यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेचा वर्धापन दिन
पारनेर । नगर सह्याद्री
छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेने ग्राहकांना पुरविलेल्या उत्कृष्ठ सेवेमुळे, शिस्तबद्ध व प्रामाणिक कामामुळे ही पतसंस्था तालुक्यातील ग्राहकांच्या व खातेदारांच्या विश्वासास अल्पावधीतच पात्र ठरली असल्याचे प्रतिपादन युवा नेते तथा जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे यांनी नुकतेच संस्थेच्या सुपा शाखेच्या तृतीय वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्रय नाना पवार, जेष्ठ पत्रकार मार्तंडराव बुचुडे, माजी उपसरपंच सागर मैड, डॉ. सुभाष डेरे, सोसायटीचे संचालक सुनिल पवार, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर, तसेच संस्थेचे सल्लागार प्रकाश भुजबळ, सचिन परांडे, पत्रकार कानिफनाथ गायकवाड, शिक्षक नेते रविंद्र रोकडे, रामकृष्ण मेहत्रे, दादाभाऊ कोल्हे, भिवसेन पवार, दत्तात्रय मेमाणे, अमोल सोनवणे, वैभव पठारे, धोंडीभाऊ नांदखिले, राजेंद्र रोकडे, दत्तात्रय डोईफोडे, शहरप्रमुख निलेश खोडदे, राष्ट्रवादीचे भिमाशेठ औटी, कैलास श्रीमंदीलकर, तंत्र स्नेही शिक्षक नामदेव शेरकर, शंभू दुधाडे,मुख्याध्यापक भाऊसाहेब साठे, प्रशांत ठुबे, संस्थेचे संचालक अरुण रेपाळे, तसेच सुपा शाखेचे ग्राहक, व्यापारी, उद्योजक, संस्थेच्या सर्व शाखांचे कर्मचारी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल पाटील शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ह्या संस्थेला खूप मोठे भविष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. दै. सकाळचे पत्रकार मार्तंडराव बुचुडे यांनी या संस्थेला संभाजी औटी सरांसारखे अभ्यासू दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभल्याने संस्था प्रगतीकडे वाटचाल करीत असल्याचेही बुचुडे म्हणाले. यावेळी संस्थेला सरपंच योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार, गुरुदेवचे अध्यक्ष संतोष मगर, डॉ. सुभाष डेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश खोडदे, डॉ. विनायक सोबले, यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक , चेअरमन श्री.संभाजी औटी यांनी संस्था राबवीत असलेले विविध उपक्रम, योजनांची माहिती दिली. ऑनलाईन बँकींग, क्यू .आर. कोड सुविधा, देशात कुठेही पेमेंट पाठविण्याची सुविधा,नेट बँकींग सुविधा, मिनी ए.टी.एम. सुविधा, आकर्षक व्याजदर, शंभूराजे लक्षाधीश योजना, धनवर्षा बचत, जिजाऊ स्वामिनी कर्ज योजना, महिला बचत गट कर्ज योजना, प्रा.शिक्षक बचत गट योजना, छोटया मोठ्या व्यावसायिंकासाठी कॅश क्रेडीट, गाई खरेदी व गोठा बांधणे व कांदा ऐरण साठी कर्ज योजना, एस.एम.एस. सुविधा, माफक दरात वाहन तारण, सोने तारण, काही शाखांत लॉकर सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेच्या सध्या सहा शाखा कार्यरत असून सर्वच शाखांमधून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लवकर संस्थेला जिल्हा कार्यक्षेत्र मिळून संस्थेच्या नगर शहरात दोन शाखा सुरू होणार असल्याचेही औटी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाधिकारी स्वप्नील ढगे, कर्मचारी वैभव पवार, रुपाली गोडसे , संस्थेच्या कर्मचार्यांनी व संचालक मंडळाने प्रयत्न केले. संस्थेचे मॅनेजर श्री. सुरेश ठुबे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परांडे यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार पत्रकार कानिफनाथ गायकवाड मानले.
COMMENTS