मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या अनेक दिवसांपासून ‘पठाण’ चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठ...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या अनेक दिवसांपासून ‘पठाण’ चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहे. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या गाण्यात आणि चित्रपटात काही बदल सुचवले आहे.
‘पठाण’ चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या चित्रपटातील गाणे आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपट निर्मात्यांना दिली आहे. हा संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असे प्रसून जोशी यांनी सांगितले आहे.
“हा चित्रपट नुकताच सीबीएफसी समितीकडे प्रमाणपत्रासाठी दाखवण्यात आला आहे. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याचे परीक्षण करण्यात आले. यावेळी परीक्षक समितीने निर्मात्यांना गाण्यांसह चित्रपटात काही बदल करण्याचे सुचवले आहे. हे सुचवलेले बदल अंमलात कसे आणावे, यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची सुधारित आवृत्ती सेन्सॉरकडे सादर करावी”, असे आदेशही सेन्सॉर बोर्डाने दिले आहे. दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Central Board of Film Certification directs makers of Shah Rukh Khan-starrer "Pathaan" to implement "changes" in movie, including its songs: Chairperson Prasoon Joshi
— Press Trust of India (@PTI_News) December 29, 2022
COMMENTS