मुंबई । नगर सह्याद्री - आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासाठी आजच...
मुंबई । नगर सह्याद्री -
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना महामार्गाच्या कामाची माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे आभार व्यक्त केले आहे.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण हे माझ्यासाठी केवळ स्वप्नपूर्ती नाही तर अभिमानाचा, गर्वाचा आहे. अभिमान यासाठी कारण या कर्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहे. समृद्धी महामार्गाचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पाहिले आहे. फडणवीस यांनी या प्रकल्पाची जबाबदारी माझ्याकडे देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आज आम्ही दोघं एकत्र असताना या महामार्गाचे लोकार्पण होतेय, याचा खूप मोठा आनंद होतोय. या मार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटते असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याचे विधान केले आहे. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचे लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या आहे. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला आहे. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून अनेक बैठका झाल्या”, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
अनेक लोकांनी प्रयत्न केले आहे. पण मी आणि देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम केले आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्पावर काम करणारे सगळे लोक सोबत होते. शेतकऱ्यांना वाटलं की त्यांचे पैसे मिळतील की नाही. पण आम्ही आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहण हा सगळ्यात मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण केला”, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे. दरम्यान, शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण पुढच्या वर्षभरात होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
COMMENTS