अहमदनगर / नगर सह्याद्री - जुनी वसंत टॉकीज रोडवरील चंदुकाका ज्वेलर्समधून दोन महिलांनी हातचलाखीने दोन तोळ्याची सोन्याची बांगडी चोरली. 25 डिस...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
जुनी वसंत टॉकीज रोडवरील चंदुकाका ज्वेलर्समधून दोन महिलांनी हातचलाखीने दोन तोळ्याची सोन्याची बांगडी चोरली. 25 डिसेंबरला सायंकाळी ही घटना घडली असून ज्वेलर्समधील सेल्समन हेमंत वसंतलाल पाठक (रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
25 डिसेंबरला सायंकाळी बुरखा घातलेल्या दोन महिला चंदुकाका ज्वेलर्समध्ये आल्या. फिर्यादी काम करत असलेल्या बांगड्याच्या काऊंटवर जाऊन त्यांनी बागड्यांची मागणी केली. फिर्यादीने दाखविलेल्या बांगड्या महिलांनी पाहिल्या परंतु खरेदी केल्या नाहीत. नंतर त्या मंगळसूत्र असलेल्या काऊंटरकडे गेल्या आणि दुकानाच्या बाहेर निघून गेल्या. दरम्यान दुकानातील सोन्याच्या स्टॉकची तपासणी केली असता त्यात एक बागडी कमी भरली. फिर्यादीने सीसीटीव्ही तपासले असता बुरखा घालून आलेल्या एका महिलेने हातचलाखी वापरून सोन्याची बांगडी तिच्या बॅगमध्ये घातलेली दिसली. त्या दुकानाच्या बाहेर आल्यानंतर रिक्षातून निघून गेल्याचेही सीसीटिव्हीत दिसले.
COMMENTS