काव्यसंग्रह भेट निघोज | नगर सह्याद्री संदीप राठोड या नवकवीने ‘भूक छळते तेव्हा’ या काव्यसंग्रह माध्यमातून समाजजिवनाचा आरसा समाजापुढे मांडण...
काव्यसंग्रह भेट
संदीप राठोड या नवकवीने ‘भूक छळते तेव्हा’ या काव्यसंग्रह माध्यमातून समाजजिवनाचा आरसा समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला असून उसतोड मजूराचा मुलगा ग्रामीण भागात राहून कवी मनातून समाजप्रबोधन करतो हेच संदीप याने दाखवून दिले असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
संदीप राठोड यांच्या ‘भूक छळते तेव्हा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच निघोज येथील मुलिका देवी महाविद्यालयात प्रसिद्ध साहित्यिक व प्रसिद्ध कवी चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हजारे यांची प्रकृती खराब असल्याने ते या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र या काव्यसंग्रहाला शुभसंदेश प्रसिद्ध करुण राठोड यांना आशिर्वाद देण्याचे काम आण्णांनी केले होते. राठोड यांनी रविवार दि.१८ रोजी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन काव्यसंग्रहाची भेट दिली. यावेळी हजारे यांनी संदीप यांचे कौतुक करीत काव्यसंग्रहाचे वाचन केले. हजारे यावेळी म्हणाले ऊसतोड मजूर म्हणून संदीप यांचे वडील लहू राठोड व आई पारुबाई राठोड यांनी कष्टप्रद जिवण जगले. उसतोड मजूराचे मुले कसे जिवण जगतात, त्यांना गरीबीचे चटके कशा प्रकारे सहन करावे लागतात हा समाजजिवणाचा सार संदीप याने काव्यसंग्रहातून व्यतीत केला आहे. ऊसतोड मजुरांचे आणी त्यांच्या कुटुंबीयांचे जिवण किती कष्टमय आहे. हेच संदीप राठोड याने मांडीत समाजजीवन माध्यमातून लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त करीत संदीप राठोड यांच्या भूक छळते तेव्हा या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS