अहमदनगर / नगर सह्याद्री - उसणे घेतलेल्या पैशाची मागणी करण्यासाठी घरी गेलेल्या एकाने दोन मित्रांच्या मदतीने विवाहितेचा विनयभंग केला. नगर शह...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
उसणे घेतलेल्या पैशाची मागणी करण्यासाठी घरी गेलेल्या एकाने दोन मित्रांच्या मदतीने विवाहितेचा विनयभंग केला. नगर शहरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. पीडिताने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय दत्तात्रय ढवळे (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) व त्याच्या सोबतचे दोन अनोळखींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी फिर्यादी घरी असताना ढवळे त्याच्या दोन साथीदारांसह फिर्यादीच्या घरी आला. ‘तुझ्या नवर्याने माझ्याकडून पैसे घेतले आहेत. त्याला ताबडतोब देण्यास सांग, नाहीतर मी तुला उचलून घेऊन जाईल,’ असे म्हणून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS