वाढदिवसानिमित्त ११० आंबा वृक्षाचे वाटप अहमदनगर | नगर सह्याद्री मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागातील विकासाच्या प्रश्...
वाढदिवसानिमित्त ११० आंबा वृक्षाचे वाटप
अहमदनगर | नगर सह्याद्री
मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागातील विकासाच्या प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम करत असतात. प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी वेळ देणारा नगरसेवक म्हणून सभापती कुमारसिंह वाकळे यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून बोल्हेगाव ग्रामीण भागाला विकास कामांतून शहरीकरणाचे रूप प्राप्त करून दिले आहे, प्रतिपादन मनपाविरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी केले.
मनपा स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने प्र. क्र.७ मधील नागरिकांना ११० आंबा वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, बाळासाहेब वाकळे, रमेश वाकळे, अरूण ससे, भाऊसाहेब वाकळे, रावसाहेब वाटमोडे, सनी वाकळे, मारूती वाटमोडे, रावसाहेब वाकळे, विजय वाकळे, मच्छिंद्र देशमुख, वैभव वाटमोडे, आकाश वायकर, महेश वाकळे, संपत वाकळे, योगेश भोसले, रोहित वाकळे, मच्छिंद्र वाकळे, किशोर देठे, सोमनाथ वाटमोडे, संतोष वाटमोडे, गणेश कळमकर, अशोक पावले, हबीब शेख, गोरख वाटमोडे, गौरव शिंदे, सतिष केदारी, बाळशिराम पावडे, दिलिप राख, भैरू वाटमोडे, हेमंत पवार, दत्तात्रय विरकर, पंकज वाकळे, सागर कराळे, तेजस डुरकुले, किशोर बामदळे, सचिन वाकळे, नयन ससे, रमेश पुंड आदी उपस्थित होते.
सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त ११० आंबा वृक्षांचे वाटप करून समाजामध्ये पर्यावरण संतुलना बाबतचा एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. याचबरोबर दहा फूट आंबा वृक्षाचे वाटप केले आहे. त्यामुळे नागरिकांना एक ते दोन वर्षात आंब्याचे फळ मिळणार आहे. विकास कामं बरोबर सामाजिक काम केल्यामुळे मनाला आनंद व समाधान मिळत असतो. संघर्ष प्रतिष्ठानने माझ्या वाढदिवसानिमित्त आंबा वृक्षाचे वाटप केल्याबद्दल मी आभारी आहे असे ते म्हणाले.
COMMENTS