रुईछत्रपती येथील श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील १९९४-९५ च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात शरद रसाळ | नगर सह्याद्री पार...
रुईछत्रपती येथील श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील १९९४-९५ च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
शरद रसाळ | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथिल श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील सन १९९४-९५ इ्यत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचे प्रथम स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्सहात पार पडले.
२८ वर्षापूर्वी रुईछ्त्रपती येथिल ज्ञानेश्वर विद्यालयात शिकणारे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये कोन्ही डॉटर, इंजिनिअर, शिक्षक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सैनिक, व्यवसायीक तर काही शेती व्यवसाय करतात. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सोशल मिडीयावर व्हॉट्स अप ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून विचार विनियमय सुरु झाला. आणि त्यातुनच एकत्र येण्याचा निर्णय झाला व ते तब्बल २८ वर्षांनी हे पुर्वीचे जुने सवंगडी एकत्र आले.
सन २००० ते २००५ पर्यंत इ्यत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण आपापल्या गावात झाले. पुर्वी सातवी नंतर शिक्षण घ्यायचे झाले तर एकमेव पर्याय रूईछत्रपती येथील श्री ज्ञनेश्वर विद्यालय असे. त्या काळी काही गावात सातवी पर्यंत शाळा तर काही गावात इ्यत्ता चौथी पर्यंतच शाळा होती. यानंतर ज्यांची कौटुंबिक परीस्थीती जेमतेम बरी होती त्या मुलांकडेच सायकल दिसत होती. अन्यथा सुमारे पाच ते सात किलोमिटर पायिपिट करून रूईछत्रपती येथे शाळेत यावे लागत होते. यात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सर्व वृतूंमध्ये विद्यार्थी नियमित शाळेत जात होते. रूईछत्रपती येथील शाळेत रुई छत्रपती, पिंपरी गवळी, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, वाळवणे या गावातील विद्यार्थी शिक्षण घेत होते. मुख्याध्यापक शेख असलेल्या ज्ञानेश्वर विद्यालय हि शाळा तालुयात नावाजलेली, अतिशय शिस्तप्रिय शाळा कोणती म्हटले तर रूईछत्रपती येथील शाळा असे सर्वसामान्यांच्या मुखातून बाहेर पडत असे. अशा या शिस्तप्रिय शाळेच्या तालमीत तयार झालेले हे विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. काहींनी आपली शासकीय सेवा पुर्ण करुन निवृत्ती घेतली तर काही व्यावसायात मग्न आहेत. तर मुली आपल्या संसारात मग्न असतांना सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तो दिवस म्हणजे रविवार दि. २५ डिसेंबर शिरूर जि.पुणे तर्डोबाची वाडी येथील शिवतारा कृषी पर्यटन केंद्र याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान सहकुटुंब हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
यानिमित्त शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुख्याध्यापक शेख सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त आजही कायम जिवणात उपयोगी पडत असल्याच्या भावना विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करताना दिल्या.
या स्नेह संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थांचा सहभाग होता. यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांनी भविष्यात गरिब व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्याचा संकल्प केला.
यावेळी रमेश गवळी, बंडू साबळे, संजय वाबळे, अशोक थोरात, विद्या बारवकर, आशा साबळे, सारिका गोसावी, अलका देठे, राहुल बलदोटा, किरण रसाळ, संदिप साबळे, संतोष साबळे, बाजीराव गांगड, अलका नाईक, वर्षा थोरात, मनीषा मांडगे, खंडू बारवकर, झुंबर बोरा, संतोष थिटे, रवींद्र भोगाडे, केशर लोणारे, वंदना गारकर, छाया चहाळ, आशा वाबळे, कोकिळा बैरागी, सुनीता वाबळे, सविता दिवटे, संगीता म्हस्के, अरुण थोरात, किशोर पवार, अमित मुथा, सोमनाथ दिवटे व इतर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार किरण रसाळ यांनी मानले.
COMMENTS