निघोेज । नगर सह्याद्री देशातील सर्वसामान्य जनतेच्या आणी विशेष करुण शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणी रा...
निघोेज । नगर सह्याद्री
देशातील सर्वसामान्य जनतेच्या आणी विशेष करुण शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे योगदान मोठे असून सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी देशविकासाचे मोठे काम केले असल्याचे प्रतिपादन जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांनी व्यक्त केले आहे. निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निघोज परिसरातील गोरगरीब गरजुना थंडीचे उबदार ब्लॅकेट वाटप करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, संस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामूशेठ लंके, भिवाशेठ रसाळ, शांताराम कळसकर, सुनिल मेसे, सिदू कर्हे, संचालिका लताबाई कवाद, वैशाली कवाद, निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, संचालक रामदास शेठ वरखडे, निघोज सोसायटीचे व्हा. चेअरमन वसंत ढवण, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे, सुनिल तांबे, देवराम ढवळे, रमेश लंके, दत्तात्रय कवाद आदी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यावेळी म्हणाले गेली अनेक वर्षांपासून पतसस्थेंचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद व त्यांच्या सहकार्यांनी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवीत वाढदिवस साजरा केला आहे. तोच सामाजिक उपक्रम निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आजपर्यंत राबवीत आहे. पवार साहेब यांचे सामाजिक काम मोठे आहे. तेच काम देशविकासासाठी महत्वपूर्ण ठरले आहे.
संस्थेचे चेअरमन वसंत कवाद म्हणाले की स्वर्गीय श्री बाबासाहेब कवाद हे पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर वर्षी निघोज परिसरातील गोरगरीब गरजूंना थंडीच्या दिवसात उबदार असे ब्लँकेटवाटप करीत असे तोच वारसा आपण आपल्या सहकार्यांसोबत चालवित आहोत. यावेळी गोरगरीब माता भगिनी नी यावेळी स्वर्गीय बाबासाहेब कवाद हे कायम आम्हांस अडीअडचणीच्या काळात मदत करीत राहीले.
त्यांची आज आम्हांस खर्या अर्थाने आठवण येते. अशा शब्दात गोरगरीब माता भगीनी नी आपले मत व्यक्त करून त्यांनी या उपक्रमाबद्दल आंनद व्यक्त केला. त्यांनी चालू केलेले उपक्रम निघोज पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद व त्यांचे सहकारी यांनी यापुढे असेच चालवावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब लामखडे यांनी केले आभार शांताराम कळसकर यांनी मानले
COMMENTS