उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा पारनेर | नगर सह्याद्री शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी आपल्य...
उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर तालुयातील आळकुटी व निघोज येथे मोफत तपासणी व शिबिराचे आयोजन करून साजरा केला. बुधरानी हॉस्पिटल व डॉटर भास्कर शिरोळे प्रतिष्ठान आयोजित या मोफत नेत्र तपासणी व शिबिरामध्ये ५८० रूग्णांची तपासणी करण्यात आली. या नेत्र शिबिरा दरम्यान दरोडीत २५० तर अळकुटीत ३३० रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया व चष्मे वाटप सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी दिली आहे.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले असून यावेळी माजी आमदार औटी म्हणाले की ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या शिबिरामुळे निश्चित आधार मिळाला असून भविष्यात सुद्धा शिवसेना नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी असे वाढदिवस साजरे करून एक नवा आदर्श समाजापुढे व पिढी पुढे उभा केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सभापती दाते म्हणाले रामदास भोसले यांचे संघटनात्मक काम चांगले आहे. त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, गणेश शेळके, डॉटर श्रीकांत पठारे, महिला आघाडीच्या प्रियंका खिलारी, डॉ. भास्कर शिरोळे, उपसरपंच आरिफ पटेल, शरद घोलप, संजय मते, दादा ठुबे, बाळासाहेब धोत्रे, अशोक शिरोळे, कैलास शिंदे, गारखिंडी सरपंच निवृत्ती चौधरी, कळस सरपंच राहुल गाडगे, माजी उपसरपंच भरतरी काणे, शिवाजी गलांडे, बाजीराव शिरोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS