अहमदनगर | नगर सह्याद्री पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिन निंदनीय टीका केल्याच्य...
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हिन निंदनीय टीका केल्याच्या निषेधार्थ सकाळी शहर भाजपाच्या वतीने लक्ष्मिकारंजा येथील पक्ष कार्यालया जवळ बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्यास चपला मारून पुतळ्याचे दहन केले. शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या आंदोलनात उपस्थित पदाधिकार्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून टाकला.
यानिमित्त भैय्या गंधे यांनी काढलेल्या निषेध पत्रकात म्हंटले आहे की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेत सर्व मर्यादा ओलांडत भारताचे प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला घेरण्यात अपयशी ठरलेल्या बिलावल भुट्टो यांच्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करावा तितका कमी आहे. हा पूर्ण भारताचा अपमान आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही अशोभनीय टिप्पणी केली आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. पाकिस्तान अनेक दशकांपासून सतत दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना आश्रय आणि प्रोत्साहन देत आहे. ज्यांना स्वतःचे घर चालवण्यासाठी दुसर्याचा आधार घ्यावा लागतो आणि स्वतःच्या देशातील अराजकतेला सांभाळता न आल्यामुळे, ज्यांनी आयुष्यतील सर्वात जास्त वर्षे देशाबाहेर राहून काढली आहेत, ज्यांच्या परिवाराला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते अशा भुट्टो परिवाराने युगपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बोलणे निश्चितच अशोभनीय आहे. बिलावल भुट्टो या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उतावीळ वक्तव्यामुळे तमाम देशवासीय संतापले असून त्याचा तीव्र निषेध करीत आहोत. शहर भाजप असे वक्त्याव्य सहन करणार नाही.सचिन पारखी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण जगात दहशतवादा विरोधात लढाई सुरु केली असून त्यास यशही येत आहे. आतंकवाद्यांना आसरा देणार्या पाकिस्तानला हे बघवत नसल्याने ते असे खालच्या पातळीवर जात आरोप करत आहेत. त्यास कोणीही भीक घालणार नाही. शहर भाजप याचा तीव्र निषेध करत आहे.यावेळी शहर भाजपाचे महेश नामदे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, अंजली वल्लाकटी, छाया रजपूत, मल्हार गंधे, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, रेखा विधाते, संध्या पावसे, पल्लवी जाधव, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, मिलिंद भालसिंग, सुमित इपलपल्ली, कुंडलिक गदादे, राहुल बुधवंत, राजेंद्र घोरपडे, सुमित बटुळे, सुनील सकट, श्रीगोपाल जोशी, चंद्रकांत पाटोळे, अमोल निस्ताने, सचिन पावले, श्रीकांत फंड, अभिषेक दायमा, महेश तवले, आदेश गायकवाड, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर धिरडे, लक्ष्मीकांत तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS