अहमदनगर । नगर सह्याद्री जिल्हा तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या मान्यता प्राप्त जिल्हा संघटने अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वरीष...
अहमदनगर । नगर सह्याद्री
जिल्हा तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर या मान्यता प्राप्त जिल्हा संघटने अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वरीष्ठ मुले व मुली तायक्वांदो स्पर्धा 2022 मध्ये श्रीगोंदा तालुका तायक्वांदो असोसिएशन ऑफ श्रीगोंदाच्या ट्विस्टर तायक्वांदो अकॅडमी श्रीगोंदाच्या जिल्हा निवड संघामध्ये कु. रोहीत गोंडगे याने वरीष्ठ गटातून अंतिम सामन्यात रौप्य पदक पटकावले, तर कु.शेखर जगताप याने वरीष्ठ गटातून कांस्यपदक पटकावले व विजयाची परंपरा कायम ठेवली. याहीपुर्वी रोहीत ने राहुरी येथे झालेल्या तायक्वांडो स्पर्धैमधे ज्युनिअर गटातून कांस्यपदक मिळविले आहे. त्याने यशाची परंपरा उंचावत ठेवली आहे.
मिळविलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा. दिपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथ आळेकर, सचिव डॉ.अशोक खेंडके, संस्था विश्वस्त अशोक होनराव, प्राचार्य बी.टी.मखरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. सदर खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे, तायक्वांदो मास्टर प्रा.सचिन आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा विद्या निकेतन श्रीगोंदा येथे नियमित सराव करत आहेत.
COMMENTS