अहमदनगर । नगर सह्याद्री कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपला अँड केले नाही म्हणून शिक्षिकेला शिवीगाळ करत भावाला व त्याच्या मित्राला मारहाण केल्याच...
अहमदनगर । नगर सह्याद्री
कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपला अँड केले नाही म्हणून शिक्षिकेला शिवीगाळ करत भावाला व त्याच्या मित्राला मारहाण केल्याची घटना सावेडी उपनगरातील एका कॉलेजवर घडली. या प्रकरणी शिक्षिकेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुस्ताफ खान व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी मित्रांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गुरूवारी दुपारी त्यांच्या कॉलेजवर होत्या. एसवायबीएचे पेपर देण्यासाठी आलेला मुस्ताफ खान हा तेथे आला होता. त्याने कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपला अँड केले नाही म्हणून फिर्यादीकडे वाईट नजरेने पाहून शिवीगाळ केले. तसेच शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ व त्याचा मित्र कॉलेजवर आले असता त्यांना मुस्ताफ खान व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
COMMENTS