महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी, ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी बाराच्या सुमारास फणसवाडी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मरीन लाइन्स येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या त्यांनी गायल्या. याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सुलोचना यांचे शिक्षण चौथीपर्यंत पूर्ण झाले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. त्यानंतर १९५३ मध्ये सुलोचना यांचा शाम चव्हाण यांच्याशी विवाह झाला. लग्नापूर्वी त्यांनी जवळपास ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यावेळी के. पार्श्वगायन क्षेत्रातही ती मार्गदर्शक म्हणून कार्यरत होत्या. आचार्य अत्रे यांच्या 'हीच माझी लक्ष्मी' या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. त्यांचा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे. त्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांनी शाम चव्हाण यांच्या कलगीतुरा या चित्रपटासाठी लावणी गायली. चव्हाण यांनीच सुलोचना यांना लावणी गायन शिकवले. शब्दफेक, स्वरातील चढ उतार याची त्यांना जाणीव करून दिली.
सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा २००९ चा राम कदम पुरस्कार, २०११ चा महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
COMMENTS