केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या वतीने स्मार्ट एज्युकेशनद्वारे पुस्तकाचे वाटप अहमदनगर | नगर सह्याद्री आजच्या आधुनिक य...
केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये आ. संग्राम जगताप यांच्या वतीने स्मार्ट एज्युकेशनद्वारे पुस्तकाचे वाटप
अहमदनगर | नगर सह्याद्री
आजच्या आधुनिक युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होताना दिसत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचाराच्या मार्गदर्शनाची खरी गरज आहे. त्यांच्यासमोर नकारात्मक विचार मांडू नये. आजच्या विद्यार्थ्यांनी एकाग्रता बाळगून शिक्षणाचे धडे गिरवावे. या बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. आजचा विद्यार्थी हा शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम बनविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्मार्ट एज्युकेशन संस्थेने पुढाकार घेऊन सराव परीक्षेचे नियोजन केले जाते. ही बाब कौतुकास्पद आहे. स्मार्ट एज्युकेशन च्या संचलिका वंदना कुलकर्णी व अशोक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या बदललेला नवीन अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धती या बाबत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी येथील केशवराव गाडीलकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना आ. संग्राम जगताप यांच्या वतीने व स्मार्ट एज्युकेशनच्या माध्यमातून पुस्तकांचे वाटप करन्यात आले. यावेळी स्मार्ट एज्युकेशनच्या संचालिका वंदना कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव नामदेवराव गाडीलकर, मुख्याध्यापक बी.बी. शिंदे, मुख्याध्यापिका एम.व्ही. बनकर आदींसह शिक्षक वृंद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संचालिका वंदना कुलकर्णी म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे.कोरोना काळामध्ये नगर शहरातील शाळांना स्मार्ट टीव्ही, शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या उपयोगासाठी शाळेंना वाटप करण्यात आले. इयत्ता दहावी ते बारावी मध्ये विज्ञान शाखेत शिकत असणारे विद्यार्थ्यांसाठी गेल्या अठरा वर्षांपासून स्मार्ट एज्युकेशन द्वारे सराव परीक्षेचे नियोजन केले जाते. स्वाध्यायासाठी लागणारे अभ्यास क्रमाचे साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. बदललेला नवीन अभ्यासक्रम व बदललेल्या परीक्षा पद्धतीच्या स्वरूपानुसार परीक्षेचे स्मार्ट एज्युकेशन द्वारे नियोजन करण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये मधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्मार्ट एज्युकेशन पुस्तकाचे वाटप करण्यात आले असे त्या म्हणाल्या.
COMMENTS