दशक्रिया विधीस लोटला जनसागर पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील कन्हेर गावासारख्या छोट्या गावातून सभापती काशिनाथ दाते व त्यांच्या कुटुंब...
दशक्रिया विधीस लोटला जनसागर
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर तालुयातील कन्हेर गावासारख्या छोट्या गावातून सभापती काशिनाथ दाते व त्यांच्या कुटुंबीयांचा प्रवास हा निश्चितच आदर्श निर्माण करणारा आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंब पद्धती बरोबर समाजकारणात व राजकारणात दाते परिवाराचे योगदान मोठे असल्याचे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी कन्हेर ता. पारनेर येथे जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांचे वडील कै. महादू नारायण दाते व चुलते कै. मारुती नारायण दाते यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना खासदार सुजय विखे पा. बोलत होते. यावेळी सभापती दाते सरांना मानणा-या जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील समाजकारण व राजकारणात दाते सरांचे योगदान मोठे आहे. त्याचा प्रत्येय म्हणजे आज दशक्रिया विधी जमलेला जनसागर होय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील हे सकाळी ८.३० वाजता कन्हेर येथे पोहोचले. दशक्रिया विधी संपेपर्यंत सभापती काशिनाथ दाते सरांबरोबर होते. यावेळी त्यांच्यासोबत राहुल पाटील शिंदे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, नगरसेवक युवराज पठारे हेही होते. दशक्रिया विधीस जिल्ह्यातून दाते सरांना मानणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. हभप गणेश महाराज बेलकर यांचे प्रवचन झाले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती मीराबाई शेटे, माजी सभापती बाबासाहेब तांबे, माजी सभापती मधुकर उचाळे, नगर सह्याद्री संपादक शिवाजी शिर्के,शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी जि.प. सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जि.प. सदस्य आझाद ठुबे, सभापती प्रशांत गायकवाड, विश्वस्त सिताराम खिलारी, गुरूदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे , तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, प्रभाकर डेरे मामा, माजी उपसभापती जुन्नर शिवाजी चव्हाण, दत्तात्रय गडाख पा, डॉ. भास्करराव शिरोळे, उद्योजक माऊली रोहोकले, गंगाराम बेलकर, शिंदे गट तालुका प्रमुख बंडु रोहोकले, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, युवा सेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, सचिन वराळ, डॉ. शिवाजी पोखरकर, अशोक कटारिया, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, भागुजी झावरे, गजानन झावरे, डॉ. उत्तम थोरात, माजी पं.स.सदस्य शिरूर वासुदेव जोरी, विठ्ठल अलभर, उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, सुनिता मुळे, बबलू रोहोकले, कान्हुर पठार पतसंस्था चेअरमन सुशीला ठुबे, पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, सनी सोनावळे, संभाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, बाबुशेठ फिरोदिया, दत्ता जोरी, बाळकृष्ण कड तालुयातील विविध गावचे सरपंच, पारनेर नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सेवा सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दशक्रिया विधी श्रध्दांजली सुत्रसंचलन रखमाजी कापसे सर यांनी केले.
दाते शेतकरी व आदर्श कुटुंब: औटी
तालुयात व नातेसंबंधात प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारे दाते सरांनी संपूर्ण कुटुंबाला सांभाळले. त्याची प्रचिती जमलेल्या जनसागरावरुन येते. काबाडकष्ट करून प्रपंच उभे करणारे दाते बंधुंचे शेवटचं आयुष्य सुखात गेले. तर पारनेर तालुयात सर्वाधिक विकास कामे सभापती काशिनाथ दाते यांनी मार्गी लागल्याचे सांगुन हे समाजकारण व राजकारणाचे संस्कार त्यांच्या वडिल व चुलत्याकडुंन मिळाले असल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी म्हणाले.
COMMENTS