पारनेर | नगर सह्याद्री महात्मा गांधींनी भारताला अहिंसेच्या मार्गाने सामान्य माणसांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. परंतु भारता...
पारनेर | नगर सह्याद्री
महात्मा गांधींनी भारताला अहिंसेच्या मार्गाने सामान्य माणसांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिले होते. परंतु भारतातील भ्रष्टाचार व प्रदूषण अस्वच्छता नशेमुळे देशअधोगतीकडे चालला असल्याची चिंता सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शहा यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश शहा अमेरिकेला स्थायिक असुन त्यांनी अण्णांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
अमेरिकाला स्थाईक प्रकाश शाह यांनी श्री संत यादव बाबा मंदिरामध्ये आदरणीय अण्णांची भेट घेतली. तसेच भारतामध्ये आर्थिक स्वातंत्र्यासाठी चेंज इंडिया मूव्हमेंट या चळवळीच्या माध्यमातून सामान्य माणूसच बदल करू शकतात. त्यामध्ये भारतातील भ्रष्टाचार व प्रदूषण, अस्वच्छता आणि नशा यावर चर्चा केली. सामान्य माणूसच हे करतोय आणि बंद सुद्धा सामान्य माणूसच करू शकतो असे शहा यांचे ठाम मत आहे. हा बदल चेंज इंडिया या चळवळीच्या माध्यमातून सामान्य माणूसच करू शकतो सामान्य माणूस या चळवळीत आपले योगदान देऊन या चळवळीत स्वतः काम करावे. यावर सामान्य माणसाचे काय मत आहे? असेही शहा यावेळी म्हणाले. यादव बाबा मंदिरामध्ये भेट घेतल्यानंतर श्री शाह यांनी आंदोलनाचे मीडिया सेंटरला भेट देऊन पाहणी केली. अण्णांनी केलेले सुरुवातीपासूनचे आजपर्यंतचे आंदोलन या प्रवासाचे सर्व माहिती अण्णांनी स्वतः श्री शहा यांना दिली. त्यानंतर पाणलोट क्षेत्र विकास या मीडिया सेंटरला ही भेट दिली पाणलोट ची सुरुवातीची ते आतापर्यंतची सर्व काम ही माहिती आदरणीय अण्णांनी शहा यांना दिली. हे सर्व पाहत असताना श्री शहा यांनी आनंद व्यक्त केला आणि अण्णांच्या या खडतर प्रवासाचे भरभरून कौतुक केले. यावेळी दत्ता आवारी, विनयजी शाह, शाम पठाडे, गाजरे मामा, नाना आवारी, रामदास सातकर, हरिभाऊ उगले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS