मुंबई: निवडक, लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बिनधास्त स्वभावामुळेदेखील ओळखली जाते. कोणत्याही विषयावर ती खुलेपणानं बो...
मुंबई: निवडक, लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बिनधास्त स्वभावामुळेदेखील ओळखली जाते. कोणत्याही विषयावर ती खुलेपणानं बोलत असते. आजवर अनेक नाटकं, चित्रपट, मालिकांमध्ये केलेलं तिचं काम प्रेक्षकपसंतीस उतरलं आहे.
अलीकडे ती काही सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. आगामी काळात ती वेब सीरिजमध्येही दिसणार आहे; पण तिनं नाटकातही पुनरागमन करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. त्यांची इच्छा आता पूर्ण झाली असून ती लवकरच रंगभूमीवर परतणार आहे. बर्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ती पुन्हा एकदा नाटकात दिसणार आहे. ’थँस डिअर’ असं त्या नाटकाचं नाव असून निखिल रत्नपारखी आणि तुषार गवारे यांनी ते लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे. निखिल या नाटकात हेमांगीसह अभिनयही करताना दिसणार आहे. या नाटकाची घोषणा हेमांगीनं सोशल मीडियावर केली आहे.
COMMENTS